ताज्याघडामोडी

4थ्या वर्धापन दिनानिमित्त पंढरपूर* *रनर्स असोसिएशनच्या वतीने फन रन, वॉकचे आयोजन

पंढरपूर :-रनर्स असोसिएशन पंढरपूर या संस्थेची स्थापना 25 नोव्हेंबर 2019 रोजी रोजी झाली. शहरातील अनेक रनर्स, व्यायाम प्रेमी इतर शहरांमध्ये धावण्यासाठी मॅरेथॉन मध्ये सहभाग घेत असत. वेगवेगळ्या शहरात जाऊन मॅरेथॉनमध्ये भाग घेतो तसं आपल्या शहरातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मॅराथान करावी व आपलं आरोग्य चांगले, निरोगी ठेवावे ही भावना घेऊन. शहरातील तालुक्यातील डॉक्टर्स,वकील,C A,इंजिनियर्स, शिक्षक,व्यापारी, नोकरदार,शेतकरी, कॉन्ट्रॅक्टर्स,अधिकारी वर्ग व इतर सर्व व्यायाम प्रेमींनी एकत्र येऊन. रनर्स असोसिएशन पंढरपूरची स्थापना केली.

 फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या मॅरेथॉनचे आयोजन करण्याचे ठरले.त्याप्रमाणे पहिल्या वर्षी 2 फेब्रुवारी 2020 रोजी DVP पंढरपूर मॅरेथॉन नावाने मॅरेथॉन घेऊन शहराला एक व्यायामाची आवड निर्माण केली. या स्पर्धेत साधारण 3500 हजार स्पर्धाकांनी सहभाग घेतला. परंतु थोड्याच कालावधीमध्ये संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारी संकटामध्ये या व्यायामाचा खूप उपयोग झाला. सर्वांना घरच्या घरी व्यायाम करून निरोगी राहण्यास मदत झाली.एक सामाजिक बांधिलकी म्हणून अन्नधान्य, मास्क,सॅनिटायझर यांचे वाटप केले. 2021,2022 या वर्षी वर्चुअल माध्यमाच्यातून या मॅरेथॉन चे आयोजन केले. असोसिएशन ने घेतलेल्या सण 2023 सालच्या राज ज्वेलर्स पंढरपूर मॅरेथॉन मध्ये 4500 हजार स्पर्धकांनी भाग घेतला.

पंढरी नगरी जशी आध्यात्मिक नगरी आहे तशी ती निरोगी,व्यायाम प्रेमी नगरी घडावी अशी इच्छा संघटनेतील सर्व पदाधिकारी,सदस्य व क्रीडाप्रेमी यांची आहे. आजच्या या फन रन मध्ये अध्यक्ष भारत ढोबळे,सचिव बालाजी शिंदे, आयर्न मॅन डॉ. चंद्रकांत मगर, डॉ.संजय सरडे, डॉ.श्री व सौ.पाटील, माधुरी माने, दिलीप कोरके, आनंद कुलकर्णी,प्रताप देवकर,सारंग कुंभार (मिस्त्री )संतोष कवडे सर,अभिजीत सरडे,भाऊसाहेब औसेकर,ताहीर खान, अमित देशमुख, आप्पा खरात,सोमेश गानमोटे, काझी व ढवळे भाऊसाहेब महेश भोसले सर यांनी सहभाग घेतला. रनची सुरवात रेल्वे मैदान, स्टेशन रोड,चौफाळा,विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा घेऊन परत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेल्वे मैदान असे रन वॉक करून पूर्ण करण्यात आले. यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या रविवारी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याची सुरुवात आज पासून झाली आहे असे अध्यक्ष भारत ढोबळे यांनी जाहीर केले.सचिव श्री बालाजी शिंदे -पाटील यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सदस्य पदाधिकारी यांची मोलाची साथ मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *