ताज्याघडामोडी

तुम्ही सकाळी शपथ घेऊन काय कराल याचा नेम नाही, आम्ही पवारांना घाबरुनच असतो: गुलाबराव पाटील

खुमासदार आणि मजेशीर शैलीत भाषणासाठी प्रसिद्ध असणारे शिवसेना आमदार गुलाबराव पाटील त्यांच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील एका विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावरुन गुलाबराव पाटील यांनी शाब्दिक कोटी केली. आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेता आणि काय करुन टाकता ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावे लागते. कारण पवारांची बुद्धी चालते तशी कोणचीही चालत नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

मंत्री गुलाबराब पाटील आपल्या बोलण्याच्या शैलीने अनेकांची कोंडी करतात तशीच अनेकांची मनेही जिंकतात. जळगाव जिल्हातील त्यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात गुलाबराव पाटील मंगळवारी लग्नात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी गेले होते. यावेळी वधू ही पवार नाव असलेल्या कुटुंबातील असल्याने गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणावेळी राजकीय फटेकबाजी करुन कार्यक्रमाला एकच रंगत आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *