गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कला केंद्राच्या नावाखाली सुरू होता वेश्या व्यवसाय; ठाकरे गटाच्या बड्या नेत्यासह 36 जणांवर गुन्हा

एकीकडे राज्याच्या राजकारणात उलथापालथ सुरू असतांना दुसरीकडे बीडमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या वरदहस्ताने बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली आहे.

आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह टीमने या सर्व प्रकाराचा पर्दाफाश केला असून याप्रकरणात 36 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नाकर शिंदे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो ठाकरे गटाचा जिल्हाधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे.

बीडच्या केज तालुक्यात असणाऱ्या उमरी येथील महालक्ष्मी कलाकेंद्रावर हा सर्व प्रकार सुरू असल्याचं पोलीस कारवाईत समोर आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे हे तिथं होते मात्र लगेच पळून गेले, अशी माहिती देखील पोलिसी खबर्यामार्फत मिळाल्याचं एफआयआरमध्ये नमूद आहे.मात्र त्यानंतर या कलाकेंद्राच्या अड्ड्यावर जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांची स्कॉर्पिओ आणि इनोव्हा दोन्ही गाड्या मिळून आल्या आहेत. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *