ताज्याघडामोडी

सणासुदीच्या काळात कर्ज मिळवणं होऊ शकतं कठीण; RBI उचलणार मोठं पाऊल?

मुलांचा शैक्षणिक खर्च, आपत्कालीन गरजा, सणासुदीनिमित्त महागड्या वस्तूंची खरेदी किंवा कोणत्याही गरजेच्या गोष्टीसाठी कर्ज घेण्याचा ट्रेंड अलीकडच्या काळात वाढला आहे.

लवकरच सणासुदीचा कालावधी सुरू होणार आहे. दसरा-दिवाळीनिमित्ताने अनेक लोक वस्तूंची खरेदी किंवा अन्य कारणासाठी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतात. पण कर्ज घेण्याच्या या वाढत्या ट्रेंडवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आरबीआय लवकरच एक मोठे पाऊल उचलणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना कर्ज घेणं कठीण होऊ शकतं. आरबीआयचं नेमकं नियोजन काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊया.

सणासुदीच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्ज घेणं अवघड होऊ शकतं. कारण आरबीआयने लोकांमधील कर्ज घेण्याच्या वाढत्या ट्रेंडबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यात पर्सनल लोनविषयी जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात. याबाबत आरबीआयने बँका आणि नॉन-बँकिंग फायनॅन्शियल कंपन्यांना (एनबीएफसी) फटकारलेदेखील आहे. अलीकडच्या काळात लोकांमध्ये पर्सनल लोन घेण्याचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. लोक लहान गरजांसाठी बचत रकमेचा वापर करण्याऐवजी पर्सनल घेण्यास प्राधान्य देतात. त्यातच काही फिनटेक कंपन्यांनी वेळेपूर्वी वेतन, बाय नाऊ पे लेटर,नो कॉस्ट ईएमआय सारखी फीचर्स सुरू केल्याने लोकांचा पर्सनल लोन घेण्याकडे कल वाढला आहे.

आरबीआयच्या ताज्या अहवालानुसार, बँकांच्या कर्जाच्या पोर्टफोलिओमध्ये वर्षाला 30.8 टक्के वाढ दिसून आली आहे. मागील वर्षी बँकांच्या पोर्टफोलिओतील ही वाढ 19.4 टक्के नोंदली गेली होती. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, आरबीआयने आपल्या पतधोरणात व्याजदर पूर्वीप्रमाणेच ठेवले आहेत. याचा अर्थ तुमच्या कर्जाचा सध्याचा ईएमआय कायम राहणार आहे.

मात्र, कर्ज घेण्याकडे वाढता कल पाहता आरबीआयने चिंता व्यक्त केली असून, यावर रिझर्व्ह बँक महत्त्वाचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे. अलीकडेच रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण आढावा सादर करताना, आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशातल्या पर्सनल लोन घेण्याच्या वाढत्या ट्रेंडबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, “बँका आणि एनबीएफसीच्या विशिष्ट प्रकारच्या पर्सनल लोनमध्ये अतिशय वेगाने वाढ होत आहे. यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *