गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

69 ऊस कामगारांची सुटका, अमानूष वागणूक देत ठेवलं होतं ओलीस; महिलांसह लहान मुलांची सुटका

महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातल्या गुना जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या कामगारांना ओलीस ठेवण्यात आलं. त्यांना ना पगार देण्यात आला, ना नीट जेवण दिलं गेलं.

गुना पोलिसांनी तेथून 69 मजुरांची सुटका केली आहे. त्यात 15 पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. सर्व कामगार सहारिया-आदिवासी समाजातील आहेत. शिवपुरी येथील एका व्यक्तीनं त्यांना काम मिळवून देण्याच्या नावाखाली महाराष्ट्रात आणलं होतं.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 नोव्हेंबर रोजी सहारिया समाजातील सुमारे 69 महिला, पुरुष आणि मुले, जिल्ह्यातील धरणवाडा आणि कँट भागातील आदिवासी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मजुरीच्या शोधात आले होते. तेथे कामाच्या शोधात सर्व लोक कागल तालुक्यातील गावातील नदीकाठावर पोहोचले. जिथे लोकांनी त्यांच्या असहायतेचा फायदा घेत सगळ्यांना उसाच्या शेतात काम करायला लावले. त्या कामाच्या बदल्यात त्यांना फक्त जेवण दिले जात होते.

CDS बिपिन रावत यांचं निधन; पार्थिवासंदर्भातले अपडेट्स, असा असेल अंत्ययात्रेचा प्रवास या कामगारांना वेतनापोटी पैसे न देता त्यांच्यावर अमानुष वागणूक दिली जात होती. विरोध केल्यावर त्यांना गावकऱ्यांनी ओलीस ठेवले आणि त्यांचं ये-जाणं, फिरणं बंद केलं होतं. असं झालं रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान नातेवाईकांना माहिती दिल्यानं कोल्हापुरात अडकलेल्या मजुरांना कोणाशीही बोलू दिलं नाही. त्यानंतर या कामगारांनी गुनामधील त्यांच्या नातेवाईकांना गुप्तपणे यासर्व घटनेची माहिती दिली.

संबंधिताने या समस्येची माहिती एसपींना दिली, त्यानंतर एसपींनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी फ्रँक नोबल ए यांनी कामगारांना घरी परतण्यासाठी गाडी उपलब्ध केली. गाडी उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील पोलिसांचे पथक कोल्हापूरकडे रवाना झाले. या पथकाकडून जिल्ह्यात कामगारांचा सातत्याने शोध घेण्यात येत होता.

या तपासादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नदीकाठच्या गावात त्यांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने गावात जाऊन पाहिले असता जिल्ह्यातून कामाच्या शोधात आलेले महिला, पुरुष आणि लहान मुले असे एकूण 69 जण अत्यंत दयनीय अवस्थेत उसाच्या शेतात काम करताना आढळून आले. पोलिसांनी मजुरांची गावकऱ्यांकडून सुटका करून त्यांना सुखरूप परत गुना येथे आणले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *