फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनि.कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत वर्चस्व
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी क्रीडाक्षेत्रात उत्तुंग यश संपादन केले आहे.सोलापूर शहर व जिल्हा ॲथलेटिक्स सोरेगाव पोलिस कॅम्पस सोलापूर येथे स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 16 वर्ष वयोगटात कु.सलोनी प्रवीण गुंगे हिने लांबउडीत द्वितीय क्रमांक मिळविला तर कु.अशिष नवनाथ जगताप याने हॅमर थ्रो मध्ये प्रथम क्रमांक मिळविला व कु.रूद्राक्ष मुरलीधर शिंदे याने हॅमर थ्रो मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला 18 वर्ष वयोगटात कु.ऋतुजा आनंद पवार हिने हॅमर थ्रो मध्ये प्रथम क्रमांक मिळविला तर कु.अपूर्वा यलमार ने हॅमर थ्रो मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर व कॅम्पस डायरेक्टर डॉ श्री संजय अदाटे, प्राचार्य श्री. सिकंदर पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. राज्यस्तरीय विद्यार्थ्यांची निवडीबद्दल अभिनंदन केले.मार्गदर्शक शिक्षक श्री पंचाक्षरी स्वामी यांचेही अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.किरण कोडग यांनी केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.