Uncategorized

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी 

शिवप्रतिमेस अभिवादन करताना एकावेळी केवळ १० व्यक्तींच्या उपस्थितीची अट

यंदाचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा हा नेहमीच्या जल्लोषात साजरा होईल अशी चर्चा दोन दिवसापासून होत असतानाच व राज्याचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या बाबत संकेत दिलेले असतानाच  आज राज्य शासनाने शिवजयंती साजरी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.   

  कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता यात अनेक निर्बंध लादण्यात आल्याचे दिसून येत असून यात १९ फेब्रुवारी रोजी गड किल्ल्यावर गर्दी न करता साधेपणाने जयंती साजरी करावी,शिजयंतीच्या निमित्ताने प्रभात फेरी काढणे,मोटार सायकल रॅली काढणे,सार्वजनिक ठिकाणी पोवाडे,व्यख्यान,नाटके आदींचे सादरीकरण करणे,अथवा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. 

 शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणी प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी एकावेळी १० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही.मात्र आरोग्य तपासणी शिबीर,रक्तदान शिबीर आयोजनास सोशल डिस्टेनसिंग पाळत आयोजन करण्यास परवानगी दिली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *