ताज्याघडामोडी

दानपेटीत १०० कोटींचा चेक मिळाला; बँकेत वठवायला आणला आन् समोर आलं धक्कादायक सत्य

देवदर्शनासाठी आलेला प्रत्येक व्यक्ती मंदिरातील दानपेटीत धनादेश दान करत असतो. दान केल्यानंतर समाधानी मनाने व्यक्ती घरी परततात. अशात आंध्रप्रदेशच्या विशाखापटणममधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे.एका व्यक्तीने मंदिरात तब्बल १०० कोटींचा धनादेश असलेला चेक दान केला आहे. मात्र चेक वठवण्यासाठी मंदिर प्रशासन बँकेत गेल्यावर जे घडलंय त्याने सर्वजण संताप व्यक्त करत आहेत.

विशाखापटणममध्ये श्रीवराह लक्ष्मी नरसिंहा स्वामी वारी देवस्थान आहे. या मंदिरातील दानपेटीत मंदिर प्रशासन पैसे गोळा करत असताना त्यांना १०० कोटी रक्कम लिहिलेला चेक मिळतो. हा चेक पाहून मंदिरातील सर्वच व्यक्ती फार आनंदी होतात. मंदिरातील ही गोष्ट वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण गावभर पसरते.चेकमधील पैसे काढून ते मंदिरासाठी वापरण्याचा विचार गावकरी आणि मंदिर प्रशासन करतं. त्यामुळे मंदिर प्रशासनातील विश्वासू व्यक्ती बँकेत जातात. कोटक बँकेचा हा चेक ते बँकेत देतात तेव्हा या अकाउंटचा बॅलेन्स तपासला जातो. बॅलेन्स तपासल्यावर यात फक्त १७ रुपये असल्याचे समजते. यामुळे आपली कोणीतरी मस्करी केली आहे असं लक्षात आल्याने मंदिर प्रशासनातील व्यक्तींनी राग व्यक्त केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *