श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिना निमित्त कर्मयोगी मध्ये व्याख्यान
प्रत्येक विद्यार्थ्यानी केवळ मार्क मिळविण्यासाठी आभ्यास न करता चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. शैक्षणिक व सामाजिक परिस्थिति बदलायची असल्यास शिक्षणाशिवाय दूसरा पर्याय नाही. हाती घेतलेल्या कामामध्ये झोकून द्या, आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेऊन कठोर परिश्रम करून स्वत:ला सिद्ध करा. कोणत्याही घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास जीवन सुंदर आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी केले. दि १७ ऑगस्ट २०२३ रोजी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यास्मरणा दिनानिमित्त कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे येथे “जीवन सुंदर आहे ” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानामद्धे ते बोलत होते.
सुरूवातीला श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांना आदरांजली वाहून मोठ्या मालकांची काम करण्याची पद्धत, समजाच्या सर्वांगीण विकासासाठी असणारी तळमळ, त्यांनी यशस्वीरीत्या चालविलेल्या विविध सहकारी संस्था अश्या अनेक गोष्टीवर प्रकाश टाकला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी मोठ्या मालकांच्या सामाजिक व राजकीय जीवनावर विस्तृतपणे माहिती दिली. मोठ्या मालकांनी अत्तापर्यन्त सहकार क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्याची तपशीलवार माहिती देऊन त्यांना सहकारातील डॉक्टर असे का संबोधले जाते हे दाखवून दिले. त्यांनी तोट्यातील सहकारी संस्था कश्याप्रकारे फायद्यामध्ये आणून यशस्वीरीत्या चालविल्या अश्या अनेक घटनामधून मोठ्या मालकांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांना आदरांजली वाहिली.
यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, कर्मयोगी पॉलिटेक्निकचे विभागप्रमुख प्रा. राजेश खिस्ते, प्रा. ज्ञानेश्वर घनवजीर, प्रा. व्यंकटेश पालीमकर प्रा. सचिन गायकवाड प्रा. इमाम कोरबू, प्रा. अमोल बाबर, प्रा. सुधीर पंढरपूरकर व इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. जे एल मुडेगावकर यांची कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. श्रीराम येवनकर यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.