ताज्याघडामोडी

पंढरपुर – मंगळवेढा मतदार संघातील ग्रामीण भागातील सिमेंट क्राँक्रीटीकरण रस्ते विकास कामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर

पंढरपुर तालुक्यातील २२ गावे व मंगळवेढा तालुक्‍यातील ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत खराब झालेअसल्यामुळे ग्रामस्थांची पावसाळयामध्ये गैरसोय होत होती. परंतु दिवंगत आमदार भारत नाना भालके
यांच्या अकाली निधनामुळे पंढरपुर मंगळवेढा मतदार संघामध्ये विकास कामे थांबली होती. व शासनाच्या विविध योजनांचा निधी ही मिळणे बंद झाले होते. भगिरथदादा भालके चेअरमन श्री विठठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर यांनी याची दखल घेवुन पंढरपुर मंगळवेढा मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांना निधी मिळावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ
साहेब यांची भेट घेवुन मतदार संघातील वस्तुस्थिती मांडल्यामुळे ग्रामीण विकास विभागाच्या ग्रामीण मुलभुत सोयीसुविधा योजनेअतर्गंत ग्रामीण भागातील सिमेंट क्रॉक्रीट रस्त्यांना निधी देण्याचे मंत्री
महोदयांनी मान्य केले होते. त्या अनुषंगाने भगिरथदादा भालके यांनी पंढरपुर व मंगळवेढा ग्रामीण भागातील गावांना सिमेंट क्राँक्रीटकरण रस्ते यास निधी मिळणेबाबत अजितदादा यांचेकडे माहे जानेवारी

दरम्यान मागणी केली होती. त्याची दखल घेत अजितदादा यांनी पंढरपुर मंगळवेढा मतदार संघासाठी सुमारे ५ कोटी निधी मंजुर केला असुन सदर निधी ग्रामविकास विभागाकडुन शासन निर्णय तयार करुन
सोलापुर सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे शासन निर्णयाव्दारे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पंढरपुर मंगळवेढा मतदार संघातील दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनानंतर मा.अजितदादा पवार
यांनी या मतदार संघाचे पालकत्व स्विकारले होते. ते आज या ५ कोटीच्या निधीच्या तरतुदीमुळे दिलेला शब्द खरा केला असल्याचे भगिरथदादा भालके यांनी सांगितले. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा
पवार व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले असुन यापुढेही अनेक विकासकामांना, शासकीय योजनांना शासनाच्या माध्यामातुन भरघोस निधी मिळवुन दयावा अशी मागणीही अजितदादा
पवार यांच्याकडे करण्यात आलेली आहे. तसेच भगिरथदादा भालके यांच्या पाठपुराव्यामुळे पंढरपुर मंगळवेढा मतदार संघामध्ये सुमारे ५ कोटीचा निधी खेचुन आणल्यामुळे मतदासंघातुन भगिरथदादा यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *