ताज्याघडामोडी

जुलै महिन्यात जवळपास 15 दिवस बँका राहणार बंद! पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

बँक हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंगमुळे लोकांची बरीचशी कामे घरबसल्याच होतात. पण मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढायची असल्यास, डिमांड ड्राफ्ट इत्यादी कामांसाठी बँकेची गरज भासते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही जुलै महिन्यात कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी बँकेत जाणार असाल, तर या संपूर्ण महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाणून घेणं गरजेचं आहे. 

जुलै महिन्यात 14 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार जुलै महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे. 

2 जुलै 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

5 जुलै 2023 : गुरु हरगोविंद सिंह जयंती (जम्मू, श्रीनगर)

6 जुलै 2023 : MHIP दिवस (मिझोरम)

8 जुलै 2023 : महिन्याचा दुसरा शनिवार

9 जुलै 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

11 जुलै 2023 : केर पूजा (त्रिपुरा)

13 जुलै 2023 : भानू जयंती (सिक्कीम)

16 जुलै 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

17 जुलै 2023 : यू तिरोट सिंग डे (मेघालय)

22 जुलै 2023 : महिन्याचा चौथा शनिवार

23 जुलै 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

29 जुलै 2023 : मोहरम (जवळपास सर्व राज्यांमध्ये सुट्टी)

30 जुलै 2023 : रविवार (साप्ताहिक सुट्टी)

31 जुलै 2023 : हुतात्मा दिन (हरियाणा आणि पंजाब)

वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरु शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *