गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलगा हवा म्हणून प्राध्यापकाचा विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; पत्नी म्हणते, मला मान्य

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एक धक्कादायक असा प्रकार समोर आला आहे. एका विभागातील प्राध्यापकाने विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केला असून यामध्ये त्याची पत्नीही सहभागी होती. पीडित विद्यार्थीनीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री दहा वाजता प्राध्यापक डॉक्टर अशोक गुरापा बंडगरसह पत्नी पल्लवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विद्यापीठातील एका विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने पोलिसात प्राध्यापकाविरोधात लैंगिक छळाची तक्रार दिलीय. विद्यार्थीनी शासकीय कला महाविद्यालयात 2019 ते 2021 मध्ये शिक्षण घेत असताना तृतीय सत्रात सर्व्हिस कोर्ससाठी एका विषयाची निवड केली होती. त्या विषयाची शिकवणी डॉ. बंडगर हा ऑनलाईन पद्धतीने घेत होता. तेव्हा पीडितेची त्याच्यासोबत ओळख झाली. चौथ्या सत्रात लघुप्रबंध सादर करण्यासाठी नोव्हेंबर 2021 मध्ये पीडितेने बंडगरचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर पीडितेने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे, असा सल्ला घेतला. तेव्हा बंडगर याने विद्यापीठातील एका विभागात प्रवेश मिळवून दिला. त्याचवेळी चित्रपटात काम करण्याचेही अमिष दाखवले.

विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर राहण्यासाठी पीडिता शहरात आली तेव्हा तिला वसतिगृहाऐवजी स्वत:च्या घरीच पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन गेले. घरी त्याच्या पत्नीनेही मुलीसारखी काळजी घेण्याचे आश्वासन दिलं. जुन 2022 मध्ये बंडगरने अनेकवेळा छेडछाड करण्याचाही प्रयत्न केला. जुलै 2022 मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडिता झोपली असताना बंडगरने बळजबरीने तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

जानेवारी 2023 मध्ये हा सर्व प्रकार बंडगरच्या पत्नीस सांगितला. तेव्हा तिने सर्व मला मान्य आहे. तू आता घर सोडून जाऊ नकोस. माझ्या पतीसोबतच लग्न कर, मला दोन मुली आहेत. आम्हाला मुलगा नाही. तुझ्यापासून आम्हाला एक मुलगा हवा असल्याचेही सांगितले. त्यानंतर बंडगरची पत्नीच विद्यार्थिनीला वारंवार त्याच्यासोबत बेडरूममध्ये पाठवत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *