गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू माफियांची गुंडगिरी जिल्हा खणिकर्म महिला अधिकाऱ्यांना लोळवून मारलं

महाराष्ट्र, बिहारसह देशभरात वाळू उपसा करण्यावरून घमासान सुरू आहे. बिहारमध्येही वाळू उपसा बंदीचा विषय जोरदार गाजत आहे.बिहारमध्ये वाळूला काळं सोनं म्हणून ओळखलं जातं आहे. दरम्यान या काळ्या सोन्यातून बिहारमध्ये माफीया बनल्याची चर्चा सुरू आहे. पटना जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रक आणि ट्रॅक्टर चालक राजरोसपणे बेकायदेशीर वालू उपसा करत आहेत.

वाळू माफियांवर जरब बसवण्यासाठी महसूलमधील अधिकारी जादा वाळूची तपासणी केली जात आहे. दरम्यान जिल्हा खनिकर्म अधिकारी ओव्हरलोडिंग वाळू तपासत असताना त्यांच्यावर दगडफेक करून मारहाण करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे, जिल्हा खनिकर्म विभागाकडून ओव्हरलोडिंग उपसा वाळू तपासमी मोहीम सुरू होती. यावेळी महिला जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी जादा भरून नेत असलेल्या वाळू विषयी विचारणा केली यावर ट्रकचालकांशी बाचाबाची झाली. त्यानंतर ट्रकचालकांनी कर्मचाऱ्यांवर विटा आणि दगडांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी तेथून पळून गेल्याची माहिती आहे.

अवैधरित्या भरलेले सुमारे दीडशे वाळूचे ट्रक पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र त्यांची सुटका करण्यासाठी वाळू माफिया व त्यांच्या साथीदारांनी हल्ला करण्यास सुरुवात केली व रेती घाटाजवळ महिला खाण निरीक्षक व त्यांच्या पथकाचा पाठलाग करून मारहाण करण्यास सुरुवात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *