ताज्याघडामोडी

बदलेची आग भडकली! जुन्या वाद डोक्यात ठेवून मित्रावरच वार, कॉलेजला जाताना केला घात

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरामधील विद्याभारती महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर त्यांच्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्याने जुन्या वादातून चाकूने वार करून एकाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक विध्यार्थी गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. हल्ला करणारा विद्यार्थी निखिल मेहरे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधात. भा.द.वी. कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी अल्पवयीन फिर्यादी व आरोपी निखिल मेहरे हे एकाच महाविद्यालयात शिकतात, फिर्यादी हा अकरावी विज्ञान शाखेचा तर आरोपी हा इयत्ता बारावीचा विध्यार्थी आहे. फिर्यादीचा मित्र बिलाल याकूब खान व मेहरे यांच्यात मागील ऑगस्ट महिन्यापासून विविध करणावरून वाद सुरू होता.

दरम्यान, आज सकाळी नऊ वाजता फिर्यादी आणि त्याच्यासोबत गुलाम दस्तगीर, बिलाल याकूब खान असे तिघेजण कॉलेजला जात असताना निखिल मेहेरे आणि त्याचे दोन अनोळखी मित्र यांनी बिलाल याकूब खान याला शिवीगाळ केली. बिलालने त्यांना शिवीगाळ का करतो असे विचारले तर निखिल मेहरे याने त्याच्या खिशातून चाकू काढून बिलाल याकुब याच्या गळ्यावर वार केला.

त्याला सोडवण्यासाठी फिर्यादी आणि त्याचे मित्र गेले असता निखिल मेहरे याने फिर्यादीचा मित्राच्या मानेवर आणि फिर्यादीच्या डाव्या डोळ्यावर चाकूने मारहाण केली. त्याच्यासोबत असणारे यांनी सुद्धा लाथा बुक्क्याने मारहाण केली. शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. यावरून आरोपी निखिल मेहरे (वय १९, रा. शिवाजीनगर कारंजा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *