ताज्याघडामोडी

मुलाला डॉक्टर बनवायचं शेतकऱ्याचं स्वप्न, शिक्षणासाठी बँकेनं कर्ज दिलं नाही, बापाची आत्महत्या

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. लेकाला शिकायला बँक कर्ज देत नसल्याने शेतकरी बापाने आत्महत्येचे शेवटच पाऊल उचललं आहे. शेतकरी बापाने बँकेकडे अनेक वेळा विनंती करून ही बँकेने दुर्लक्ष करत कर्ज देण्यास नकार दिल्याने नैराश्यात बापाने हे शेवटच पाऊल उचलल आहे. महादेव पाटील (वय वर्ष ४५, रा. पिसात्री ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणात बँकेकडून कोणताही वक्तव्य करण्यात आले नसून शेतकऱ्याच्या कुटुबियांनी बँकेने मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज न दिल्याने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेव पाटील यांचा मुलगा जयसिंगपूर येथील एका महाविद्यालयात बीएचएमएसचे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. महादेव पाटील हे स्वतः जरी शेतकरी असले तरी मुलाला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न त्यांचं होत. मात्र पैशाची अडचण असल्याने मुलाची वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी जवळच्या एका राष्ट्रीयकृत बँकेत संपर्क साधला होता. तर बँकेने पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये या कर्ज देतो असे म्हणत तोपर्यंत तुमच्या जवळ असलेले पैसे भरा असे सांगितले. म्हणून शेतकऱ्याने दागीने गहान ठेवून पैसे भरले. मात्र दुसऱ्या वर्षी फेब्रुवारी मध्ये जेव्हा ते बँकेत कर्ज मागण्यासाठी गेले तेव्हा बँकेने कर्ज देण्यास नकार दिला असे मृत शेतकऱ्यांच्या नातेवाइकानी सांगितले.

पाटील यांच्या मित्रांकडून तसेच जवळच्या नातेवाईकांकडूनही बँक मॅनेजरला कर्जासाठी विनंती करण्यात आली होती, तरीही त्यांनी कर्ज दिले नाही. त्यामुळे आपल्या मुलासाठी कोणी कर्ज दिलं नाही, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते मुलाच्या भवितव्यावरुन तसेच मुलीचे लग्न न झाल्याने ते चिंतेत होते आणि नैराश्यातून त्यांनी राहत्या घरातच घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे उघड झाले. यामुळे परिसरात एकच हा व्यक्त केली जात असून बँके विरोधात देखील रोष व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *