ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड व झेंसार कंपनीमध्ये सामंजस्य करार

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयाचा मुंबई येथील आरपीजीएफ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, झेंसार सीएसआर उपक्रमाअंतर्गत नुकताच सामंजस्य करार झाला असून या कंपनी मार्फत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या प्रशिक्षण देण्यात येणार आहेत या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयातील विविध विभागातील ४३ विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

सिंहगड संस्थेचा विस्तार खुप मोठा आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नामंकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या खुप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना झेंसार कंपनीकडून नोकरीसाठी आवश्यक असलेले उच्च दर्जाचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे.या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या श्रीपाद लोखंडे, सिमंतीनी कुंभार, गौरांग मुळे, सुयश लोकरे, साक्षी खरे, पुजा विरकर, किर्ती जाधव, सुनिल डुकरे, शितल गायकवाड, प्रणोतो घोडे, चैतन्य कोळे, सागर भुमंकर, मुनिरा खान, शुभम माळी, श्रेया थिटे, मानसी नवले, अविनाश भिलारे, उत्कर्ष उघडे, अजित पाटिल, रोहित कोळी, आशुतोष देशपांडे, अभिजित नलवडे, सैफ शेख, सोनम अंकुशराव, आसावरी बोक्से, अभिषेक गोडसे, सानिया तांबोळी, कोमल भानवसे, अभिनव काकडे, रुक्मिणी शिर्के, कान्होपाञ लोकरे, पोर्णिमा खरात, ज्योती पवार, मोनिका माळी, तेजस्विनी काळे, ज्ञानेश्वर राऊत, सिमरान शेख, शंकर चव्हाण, सुदर्शन मकर, कोमल माळी, उज्ज्वला मेहर, विशाल वाघमारे, अनिरुद्ध जाधव आदी विद्यार्थ्यांची “झेंसार प्रा. लिमिटेड” कंपनीत प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

या कंपनी मार्फत विद्यार्थ्यांना मोफत २४० तासांचे एप्टिट्युड स्किल, साॅप्ट स्कील, पायथॉन, जावा, एसक्युएल, मॅन्युअल टेस्टिंग, अँडव्हान्स जावा इत्यादी टेक्निकल स्कीलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात होणार आहे.
प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी, प्रा. मेघा गोरे, प्रा.अतुल कुलकर्णी, प्रा. अमोल कांबळे, प्रा. बाळकृष्ण जगदाळे, प्रा. दत्तात्रय कोरके आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *