ताज्याघडामोडी

फेब्रुवारीत 10 दिवस बॅंक राहणार बंद; आजच करून घ्या महत्वाची कामे

फेब्रुवारी महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी RBI ने जाहीर केली आहे. आबीआय च्या यादीनुसार फेब्रुवारी महिन्यात 10 दिवस बॅंक बंद राहणार आहे.यामुळे तुमचे काही महत्वाचे कामे असतील तर आजच करुन घ्या.अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि तुमचे काम रखडण्याची शक्यता आहे.

नविन वर्षात म्हणजेच जानेवारीत शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह 14 दिवस बँका बंद होत्या. आरबीआयने जारी केलेल्या नियमांनुसार, खासगी किंवा सरकारी बँकांना रविवारसह महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद ठेवावी लागते.

फेब्रुवारी महिन्यातील बँक सुट्ट्या

15 फेब्रुवारी – लुई-नगाई-नीमुळे, मणिपूरमध्ये बँकेला सुट्टी असेल.

18 फेब्रुवारी – महाशिवरात्रीनिमित्त बँका बंद राहणार आहेत.

20 फेब्रुवारी – अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये राज्य स्थापना दिनानिमित्त बँका बंद राहतील.

22 फेब्रुवारी – सिक्कीममध्ये लोसारच्या निमित्ताने बँका बंद राहतील.

आठवड्याच्या शेवटी बँका या दिवशी राहणार बंद

फेब्रुवारीमध्ये वीकेंड असल्याने बँका (Bank) एकूण सहा दिवस बंद राहणार आहेत. रविवार असल्याने बँकांना 5, 12, 19 आणि 26 तारखेला सुट्टी असणार आहे. तसेच 11 आणि 25 फेब्रुवारीला दुसरा आणि तिसरा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *