पंढरपूर ः 04- मतदार संघातील मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाणी प्रश्न हा अंतिम टप्यात असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री जयंतरावजी पाटील यांनी रांझणी, ता.पंढरपूर येथील प्रचार शुभारंभ प्रसंगी सांगितले.
श्रीक्षेत्र रांझणी, ता.पंढरपूर येथील श्री शंभू महादेवाला नारळ वाढवून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भारत भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
याप्रसंगी बोलतांना ना.श्री जयंतराव पाटील साहेब म्हणाले की, स्व.आ.भारतनाना भालके यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मंगळवेढा तालुक्यातील 35 गांवच्या पाणी प्रश्नासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. सध्या मी जलसंपदा मंत्री असल्यामुळे या कामाला आता कोणताही अडथळा येऊ देणार नाही. तसेच त्यांची पंढरपूर व मंगळवेढ्यातील अपुर्ण विकास कामे हे आता श्री भगिरथदादा यांचे माध्यमातून पूर्ण करावयाची आहेत. ही पोट निवडणुक जनशक्ती विरूध्द धनशक्ती अशी असल्याने राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भालके यांना जास्तीत-जास्त मताधिक्य देण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलतांना ना.श्री दत्तात्रयमामा भरणे साहेब म्हणाले की, मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील अपूर्ण विकास कामांसाठी झुकते माप देण्यास कुठेही कमी पडणार नाही. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भालके यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे.
सदर प्रसंगी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री भगिरथ भारत भालके म्हणाले की, स्व.आ.भारतनाना भालके यांना विधानसभा निवडणुक सन 2009 2014 व 2019 मध्ये आपण ज्या विश्वासाने निवडून देऊन तुमची मायेची सावली दिली त्याचप्रमाणे मलाही तुमचे मतदानरूपी आशिर्वाद देऊन मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे कळकळीचे आवाहन केले. रांझणी,ता.पंढरपूर येथील श्री शंभू महादेव मंदिरामध्ये आज प्रचाराचा शुभारंभ करीत आहे याच देवस्थानासाठी ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास योजनेतून रू.2 कोटींचा निधी दिलेला असून देखील विरोधक मागील 11 वर्षाचा विकास कामांचा हिशोब मागून जनतेची दिशाभूल करीत आहेत.
सदरवेळी सर्वश्री आ.संजयमामा शिंदे तसेच दिपकआबा साळुंखे-पाटील, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, उत्तमराव जानकर, चंद्रकांत देशमुख, प्रकाश पाटील, शिवाजीराव काळुंगे सर, साईनाथभाऊ अभंगराव, संभाजी शिंदे, विजयसिंह देशमुख यांचेसह सौ.शलाका पाटील आदींची भाषणे केली.
यावेळी सर्वश्री पक्ष निरीक्षक सुरेश घुले, आ.यशवंत माने, उमेश पाटील, महेश कोठे, अनिल सावंत, नंदकुमार पवार, रविकांत वरपे, संकल्प डोळस, श्रीकांत शिंदे, अरूण आसबे, चंद्रकांत घुले, तानाजी खरात, भारत बेदरे यांचेसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व रांझणी परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री विजयसिंह देशमुख यांनी केले, तर सूत्र संचालन श्री लतिफ तांबोळी यांनी केले. तसेच आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर विधानसभा अध्यक्ष श्री संदीप मांडवे यांनी मांडले.
