ताज्याघडामोडी

सावधान! हे पाच अ‍ॅप्स तुमचं बँक अकाउंट रिकामं करू शकतात

मोबाईलचा आपण फोटो क्लिक करण्यापासून ते पैसे ट्रांसफर करण्यापर्यंत वापर करतो. यामुळे आपल्या बँकचे अनेक डिटेल्स या फोनवर स्टोअर होतात आणि याचा सर्वात मोठा फायदा हॅकर्स उचलण्याचा प्रयत्न करतात.

सध्या एक नवा स्कॅमची चर्चा सुरू आहे. या मेलवेयरद्वारे युजर्सला टारगेट केले जात आहे आणि यूजर्सच्या बँक अकाउंटची डिटेल्स स्कॅमर्सपर्यंत पोहचवली जाते. रिपोर्टनुसार, मेलवेयर यूजर्सचा अकाउंट नंबर आणि लॉगिन आयडी असते. 

यामुळे यूजरचे बँक अकाउंट रिकामं होऊ शकते. अशात अशा मेलवेयरपासून सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. काही दिवसापूर्वी 5 एंड्रॉइड अ‍ॅप्सच्या बाबत रिपोर्ट समोर आली होती. हे अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक असून यूजर्सच्या बँक अकाउंटला रिकामं करू शकतात.

या अ‍ॅप्सविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. जर तुमच्या मोबाईलमध्येही हे पाच अ‍ॅप्स असेल लगेच डिलीट करा. 

१. File Manager Small

२. Lite, My Finances Tracker

३. Zetter Authentication

४. Codice Fiscale 2022

५. Recover Audio, Images & Videos 

जर तुम्ही या अ‍ॅप्सचा वापर करत असाल तर आपल्या बँक अकाउंटची डिटेल्स स्कॅमर्सपर्यंत पोहचू शकते ज्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. रिपोर्टनुसार या अ‍ॅप्सला लाखो लोकांनी डाउनलोड केले आहे. कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना नेहमी ऑफिशियल अ‍ॅप स्टोरवरुनच डाउनलोड करा. अ‍ॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची रेटिंग आणि डिटेल्सही चेक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *