ताज्याघडामोडी

“सोमनाथ मंदिर तोडून गझनीने कोणतीही चूक केली नाही”; ऑल इंडिया इमाम असोसिएशनच्या अध्यक्षांचं वादग्रस्त विधान

वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारे ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष तथा मुस्लीम धर्मगुरु मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिरची लूट करून मोहम्मद गझनीने कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचे ते म्हणाले.

८०० वर्षांच्या मुघल साम्राज्यात अनेक बादशाहा होऊन गेलेत. त्यांचा इतिहास वाचला तर त्यांचा धर्माशी काहीही संबंध नव्हता, हे दिसून येईल. त्यांनी धर्माच्या नावावर कोणतंही काम केलं नाही. अशी अनेक उदाहरणं देता येईल. मोहम्मद गझनीबद्दल लोकं म्हणतात, की त्याने सोमनाथ मंदिर तोडले. मात्र, इतिहास असं सांगतो की तेथील काही लोकांनी आस्थेच्या नावावर गैरप्रकार सुरू असल्याची तक्रार गझनीकडे केली होती. त्यानंतर गझनीने मंदिर परिसराची पाहणी केली. जेव्हा त्याला लोकांची तक्रारी खऱ्या आहेत, याची खात्री पटली, तेव्हा त्याने सोमनाथ मंदिरावर हल्ला केला. सोमनाथ मंदिर तोडून त्याने कोणतीही चूक केली नाही. गझनीने तिथे होणाऱ्या गैरकृत्यांना आळा घालण्याचं काम केलं, अशी प्रतिक्रिया रशीदी यांनी दिली.

यापूर्वीही रशिदी यांनी राम मंदिराबाबत वादग्रस्त विधान केलं होते. आमच्या भावी पिढ्या राम मंदिर पाडून मशीद बांधतील. आज मुस्लीम शांत आहेत. मात्र, येत्या काळात इतिहास लिहिला जाईल, असं ते म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *