३७० रुपये रोख रक्कम जप्त
मागील काही महिन्यापासून पंढरपुरात जगोजागी मटका एजन्ट बिनधास्तपणे खुलेआम मटका जुगाराच्या नावाखाली आकडे घेताना दिसून येत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.अधून मधून अशा मटका एजटांवर पोलीस कारवाई होतानाही दिसून येते.मटका जुगाराच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करताना रंगेहात पकडून गुन्हे दाखल झाल्याचे प्रकार अधून मधून घडत असतात.गुन्हे दाखल झालेले बहुतांश मटका एजन्ट वारंवार याच गुन्ह्यातील आरोपी असल्याचेही दिसून येते.मात्र प्रत्यक्ष बुकी चालकावर कारवाई होणे हि तशी दुर्मिळ घटनाच म्हणावे लागेल.
गुरुवार दिनांक ५ जानेवारी रोजी पंढरपूर शहर पोलिसांनी भादुले चौक परिसरात एका मटका एजन्ट वर कारवाई करीत त्याच्याकडून ३७० रुपये रोख व मटक्याचे आकडे लिह्ण्यासाठी उपयोगात आणला जाणारा कागद ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मटका एजंटची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून देण्यात आलेल्या माहिती नुसार शाम वाघमारे या बुकी मालकाच्या सांगण्यावरून मटका जुगाराचे आकडे घेतले जात असल्याची माहिती मिळताच बुकी मालक शाम वाघमारे व मटका एजन्ट अनिल वाडेकर यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे,