ताज्याघडामोडी

.तर शरद पवारही ते मान्य करणार नाहीत; ‘जाणता राजा’ प्रकरणी कोल्हेंचं स्पष्टीकरण

छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आहेत की धर्मवीर हा वाद संपतो न संपतो तोच शरद पवारांना जाणता राजा म्हणण्यावरून नवा वाद पेटला आहे. याबद्दल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना तुम्ही शरद पवार यांना तुम्ही शरद पवरांना जाणता राजा मानता का?

मी एक गोष्ट मानतो की छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय राजे होते. माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहचता येते, याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असे खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

मागे एका मंत्रीमहोदयानी त्यांच्या नेत्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. जर जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं कोणी म्हणतं असेल, की अमुक एका व्यक्तीला जानता राजा म्हटलं म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजच म्हटलंय तर प्रत्येकाचाच त्याला विरोध असेल. माझाचं काय स्वतः शरद पवार हे देखील ही गोष्ट अमान्य करतील.

पुढे बोलताना कोल्हे म्हणाले की, पण सर्व व्यवस्थेची माहिती असलेलं, जाणं नेतृत्व या भावनेनं म्हटलं असेल, तर ती जाण असणं, माहिती असणं हे कुणालाही वाईट नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. कोणी प्रयत्नही करू नये असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

तसेच हात जोडून विनंती आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या आपल्या प्रतिकांना अकारण रोजच्या राजकारणात ओढू नका, असेही कोल्हे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *