ताज्याघडामोडी

ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव कारची धडक

तीन तरुण जागीच ठार

अंबाजोगाईकडून लातूरकडे भरधाव वेगात चाललेल्या कारने क्रमांक (एम.एच. ४४ यु ०६४७) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले. अपघात एवढा भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातामध्ये बबन राठोड, नंदू राठोड आणि राहुल मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला.

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाणे हद्दीतील मोरवड पाटीजवळ काल सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मृत तिघे परळीचे असून या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *