ताज्याघडामोडी

अनोळखी नंबरवरून कॉल आला; हॅलो हॅलो करत राहिला; OTPशिवाय खात्यातून ५० लाख उडाले

दिल्लीत घडलेल्या एका घटनेमुळ पोलीस हैराण झाले आहेत. दिल्लीत सिक्युरिटी एजन्सी चालवणाऱ्या एका व्यक्तीनं सायबर चोरीचा फटका बसला. शमशेर सिंह नावाच्या व्यक्तीला कोणीतरी वारंवार कॉल केले आणि त्यांच्या कंपनीच्या खात्यातून ५० लाख रुपये काढण्यात आले. विशेष म्हणजे सिंह यांनी OTP शेयर केलेला नव्हता.

१३ नोव्हेंबरला घडलेली घटना महिन्याभरानंतर उघडकीस आली आहे. शमशेर त्या दिवशी घरी नव्हते. त्यांनी पोलिसात नोंदवलेल्या एफआयआरनुसार, एका अनोळखी नंबरवरून त्यांना कॉल आला. शमशेर यांनी कॉल घेतला. मात्र समोरून आवाज आला नाही. त्यानंतर पुढे अजब घटना घडल्या. पहिल्या फोननंतर विविध नंबरवरून त्यांना अनेक कॉल आले. काही कॉल त्यांना घेतले नाहीत. काही घेतले. मात्र प्रत्येकी वेळी समोरून आवाजच आला नाही.

जवळपास तासभर हा सर्व प्रकार सुरु होता. मात्र त्यानंतर घडलेल्या घटनांनी शमशेर यांना घाम फुटला. त्यांनी फोनवर आलेले मेसेज पाहिले. सिक्युरिटी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यातून जवळपास ५० लाख रुपये गायब झाले होते. हे कसं झालं याची कल्पना त्यांना नव्हती. त्यांनी मुलगा योगेशला याची माहिती दिली. यानंतर १५ नोव्हेंबरला पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तक्रार घेऊन तपास सुरू केला. शमशेर यांना ओटीपी मिळाला होता. मात्र मोबाईल कॉम्प्रोमाईज झाल्यानं त्यांना याची माहिती मिळाली नसल्याचं दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलच्या डीसीपींनी सांगितलं. अशा प्रकारचे गुन्हे जामताडा गँगकडून केल्या जाताता. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *