ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यात आपटे उपलप प्रशाला द्वितीय

पंढरपूर येथील आपटे उपलप प्रशालेने रिड टू मी सॉप्टवेअर आणि अँड्रॉईड ॲपचा वापर करून प्रभावी काम केल्याने महाराष्ट्र शासन व इंग्लिश हेल्पर या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रशालेचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान केला. यावेळेस प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जयंत हरिदास व पर्यवेक्षक श्री दत्तात्रय धारूरकर सर यांचा विशेष सन्मान केला .इंग्रजी विषय शिक्षक श्री अनिल जाधव सर यांनी यशस्वी उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण सोलापूर चे प्राचार्य मा डॉ रामचंद्र कोरडेसाहेब यांनी प्रमाणपत्र व बक्षिस देऊन सत्कार केला.
        राज्य शासन आणि इंग्लिश हेल्पर या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रीड टू मी सॉफटवेअर आणि ॲड्रॉईड ॲपच्या मदतीने विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचा उत्तम प्रकारे अभ्यास करता येतो. यामध्ये शाळेत इंग्रजी शिकविताना रीड टू मी सॉफ्टवेअरचा वापर करून शिक्षकांनी शिकवण्यासाठी एक प्रोत्साहनपर स्पर्धा आयोजित केली होती . त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आपटे उपलप प्रशालेस द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. हा प्रकल्प राज्यातील ९० हजार शाळा आणि 1 कोटी ६० लाख विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध आहे.
             कार्यक्रमास जिल्हा शिक्षण व  प्रशिक्षण सोलापूरचे प्राचार्य मा डॉ रामचंद्र कोरडे सर , विस्ताराधिकारी मा. लिगाडे साहेब , पंढरपूर तालुका विषय साधन व्यक्ती मा श्री आप्पासाहेब तौर सर , रिड टू मी  प्रकल्पाचे राज्य समन्वयक  श्री कार्तिकस्वामी देवमाने सर यांनी विशेष उपस्थिती दर्शविली. 
    आपटे उपलप प्रशाला ही नेहमी नवनवीन उपक्रम राबवण्यास नेहमी अग्रेसर असते. हे ॲप विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढीसाठी खूप उपयोगी पडले असे मुख्याध्यापक श्री जयंत हरिदास सर यांनी नमूद केले. 
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अनिल अभंगराव सर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय  श्री भातलवंडे सर यांनी केला. आभार श्री धारूरकर सर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खरात सर यांनी केले. यावेळी इंग्रजी विषय शिक्षक श्री कुसुमडे सर, , श्री थिटे सर  कु. ओव्हाळ मॅडम तसेच जेष्ठ शिक्षक श्री गुलाखे सर  श्री चांडोले सर उपस्थित होते. विदया विकास मंडळाचे सचिव मा श्री बी. जे. डांगे सर यांनी प्रशालेने मिळवलेल्या यशाबद्दल  अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *