ताज्याघडामोडी

महाराष्ट्राला मोठा दिलासा! राज्यात आज 26,616 नवे रुग्ण, मृतांची संख्याही घटली

मुंबईः राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असून, रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत होती. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाकरे सरकारनं लॉकडाऊनही 1 जूनपर्यंत वाढवलाय. विशेष म्हणजे ठाकरे सरकारच्या या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येताना दिसत आहे. राज्यात दररोज 60 हजारांच्या घरात रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून, आज राज्यात फक्त 26,616 रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील कोरोना संक्रमणांचं प्रमाण कमी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय. 

राज्यात आज 26,616 नवीन रुग्णांचे निदान

राज्यात आज 26,616 नवीन रुग्णांचे निदान झाले असून, राज्यात आज 516 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय.त्यामुळे मृत्यूदर हा 1.53 टक्के एवढा झालाय. राज्यात आज 26,616 नवीन रुग्ण सापडल्यानंतर राज्यात आज रोजी एकूण 4,45,495 सक्रिय रुग्ण आहेत. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 54,05,068 झालीय.

राज्यात आज 48,211 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत

राज्यात आज 48,211 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत, राज्यात आजमितीस एकूण 48,74,582 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,13,38,407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,05,068 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 33,74,258 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 28,102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *