ताज्याघडामोडी

सिंहगडचे समाधान माळी यांची ५ कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड

○ मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेऊन मिळवले वार्षिक ४ लाख पॅकेज

पंढरपूर: प्रतिनिधी

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आय टी कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून प्लेसमेंट होणेसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय सरकारी नोकरी मिळविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. बदलत्या टेक्नॉलॉजी नुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण दिले जात असून पालकांनी आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी पंढरपूर सिंहगडला प्राध्यान्य दिले आहे. महाविद्यालयातील उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, सांमजस्य करार, शासनाच्या सुविधा याव्यतिरिक्त शिस्तप्रिय प्राध्यापक वृदं असलेले पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज आहे. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षात शिक्षण घेत असलेले मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील पांढरेवाडी (ता.पंढरपूर) येथील कुमार समाधान किसन माळी यांची जगातील नामांकित ५ कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज आणि उद्योग क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या करारांचा फायदा सिंहगड काॅलेज मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष उद्योगातील प्रश्नांचे स्वरूप जाणून घेण्यासाठी विविध नामांकित कंपनीतील पदाधिकारी यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात येत असते. याचा फायदा विद्यार्थ्यांना जगातील नामांकित कंपनीत प्लेसमेंट होत आहे.
पांढरेवाडी (ता.पंढरपूर) येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कुमार समाधान किसन माळी यांची क्यु स्पायडर, एलेशन, माइंट्री या कंपनीत-४ लाख, इन्फोसिस कंपनीत ३.६० लाख आणि विप्रो कंपनीत ३.५० लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. यापैकी माइंट्री हि कंपनीत नोकरी करणार असल्याचे समाधान माळी यांनी सांगितले.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून त्यांचे कॅम्पस प्लेसमेंट होणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच नोकरी मिळावी यासाठी पंढरपूर सिंहगड काॅलेज नेहमी प्लेसमेंट पुर्व प्रचंड सराव, मुलाखती, चर्चासत्र आयोजित करून विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असते. यामुळेच आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत महाविद्यालयातील विद्यार्थी आजही मोठ्या प्रमाणात निवडले जात आहेत.
विविध कंपनीत निवड झालेल्या समाधान किसन माळी यांची प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *