ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या अमृता माळी ची तीन कंपनीत निवड

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेतलेल्या आटपाडी येथील कुमारी अमृता माळी हिची ३ आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड ही एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे. जी बी २सी, बी२बी आणि किरकोळ ग्राहकांना वेब पोर्टलद्वारे उत्पदनांची विक्री सेवा प्रदान करत आहे. याशिवाय क्यु स्पायडर, कॅपजेमिनी कंपनीत वार्षिक पॅकेज ४ लाख पगार मिळणार आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड काॅलेज मधील अमृता माळी यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज हे विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात उत्तम बनविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर होण्यासाठी चांगल्या कंपनी प्लेसमेंट होणे आवश्यक असते. यासाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये प्लेसमेंट साठी आवश्यक असलेले गुण, प्लेसमेंट तयारी या सर्वच गोष्टी अभ्यासक्रमात सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात येतात. यामुळे प्लेसमेंट सामोरे जात असताना विद्यार्थी सर्व गुणसंपन्न तयार होतो. यातूनच विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीत प्लेसमेंट होत आहे. सुरवाती पासून प्लेसमेंटची तयारी घेण्यात येत असल्याने विद्यार्थी आत्मविश्वासावर नामांकित कंपनीत निवडले जात आहेत.
सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत असलेली कुमारी अमृता माळी हिची “इंडियामार्ट, क्यु स्पायडर, कॅपजेमिनी या तीन कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कुमारी अमृता माळी ही कॅपजेमिनी वार्षिक ४ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणा-या कंपनीत नोकरी करणार असल्याचे अमृता माळी हिने सांगितले.
तिच्या या यशाबद्दल सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *