ताज्याघडामोडी

मुलं चोरणारा समजून कारचालकाला मारहाण; सात किलोमीटर केला पाठलाग

भोकरदनमध्ये लहान मुलाच्या अपहरणाची अफवा, लहान मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीचा सदस्य समजून कारचालकाला बेदम चोप देत नागरीकांकडून कारची तोडफोड करण्यात आली. भोकरदन मधील इब्राहिमपूर फाट्यावर हा प्रकार घडला.

लहान मुलांना पळवणाऱ्या टोळीचा सदस्य समजून नागरीकांनी एका कारची तोडफोड करत कार चालकाला बेदम चोप दिला.जालन्यातील भोकरदनमधील इब्राहिमपूर फाट्यावर हा प्रकार घडलाय.दरम्यान हा अपघाताचा प्रकार असून लहान मुलांना टोळी असल्याची अफवा असल्याचा खुलासा भोकरदन पोलिसांनी केला.त्यामुळे भोकरदनमध्ये एका अपघाताला अपहरणाचं स्वरूप देण्यात आल्यानं पोलीस ठाण्यासमोर हजारो नागरीकांचा जमाव दिसून आला.

भोकरदनमध्ये रात्री उशिरा एक आजोबा न्यायालय परीसरातून त्यांच्या दोन नातवांना स्कुटीवर बसून घरी जात होते. याचवेळी जालन्याहून सिल्लोडकडे जाणाऱ्या एका भरघाव कारनं त्यांना जोराची धडक दिली. यावेळी स्कुटीवरील एक लहान मुलगा भरधाव कारच्या बोनेटवर उडाला. मात्र त्यानं कारच्या वायफरला पकडलं. या कार चालकानं लहान मुलगा वायफरला लटकलेला असतानाही कार न थांबवता वेगानं पळवनं सुरूच ठेवली. त्यामुळे कारच्या वायफरला लटकलेल्या मुलानं वाचवा वाचवा म्हणत आरडा ओरड सुरू केली.

त्यामुळे या लहान मुलाचं अपहरण केलं जात असल्याची अफवा पसरली. मात्र, कारचालक वेगानं ही कार चालवत असल्यानं नागरीकांनी या कारचा पाठलाग केला. सिल्लोड रोडवरील इब्राहिमपूर फाट्याजवळ तब्बल 7 किलोमीटर कारच्या वायफरला पकडून लटकत आलेल्या मुलाची सुटका केली. यावेळी नागरिकांनी कारचालकाला बेदम चोप देत त्याच्या कारची तोडफोड केली.त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी कारचालकाला ताब्यात घेऊन हा अपहरणाचा प्रकार नसून अपघात असल्याचं सांगितलं. दरम्यान लहान मुलाचं अपहरण झाल्याच्या अफवेनं भोकरदन पोलीस ठाण्यासमोर हजारो नागरिकांचा जमाव जमला होता.अखेर पोलिसांनी हा जमाव हटवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *