गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बांधकाम कंपनीच्या सुपरवायझरला खंडणी मागणारा शिवसेनेचा माजी जिल्हाप्रमुख गजाआड

बांधकाम कंपनीच्या सुपरवायझला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. देऊरवाडा ते आर्वी या हायवेचे काम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरु आहे. या कामावरील सुपरवायझरकडे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख याने खंडणीची मागणी केली. या प्रकरणात पोलिसांनी निलेश देशमुख याला आज (सोमवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास अटक केली.

कंपनीच्या रास्ता बांधकामावर काम करीत असलेले सुपरवायझर अनिकेत नंदकिशोर वसु (रा. वलगाव) यांना जीवे मारण्याची धमकी व खंडणी मागितल्या बाबतची तक्रार आर्वी पोलीस ठाण्यात वसु यांनी दिली.

वसु यांच्या तक्रारीनुसार शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सुपरवायझर अनिकेत वसु हे देऊरवाडा-आर्वी रस्त्याचे काम सुरु असातना तेथे निलेश देशमुख आले. त्यांनी काम सुरु असलेल्या टिप्पर समोर इनोवा गाडी आडवी लावून काम बंद केले व वर्गणीच्या पैशांची मागणी केली. तसेच जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत काम करु देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच माझे मालक व मला अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली, असे अनिकेत वसु यांनी तक्रारीत म्हटले आहे.

निलेश देशमुख व चार ते पाच लोक 30 मे रोजी पुन्हा कामाच्या ठिकाणी काम बंद करण्यासाठी आले. जोपर्यंत माझी वर्गणी देत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही अशा प्रकारची बतावणी करुन अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन काम बंद पाडले, असेही वसु यांनी तक्रारीत म्हटले आहे. आर्वी पोलिसांनी निलेश देशमुख याच्यावर कलम 341 व 384 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *