ताज्याघडामोडी

पंढरपुरात पुन्हा तोतया पोलिसाकडून महिलेची फसवणूक

पावणेचार तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास

शहरातील उपनगर परिसर अथवा कमी वर्दळीच्या रस्त्यावर मधून अधून तोतया पोलिसांचा वावर असल्याचे विविध घटनांमुळे निदर्शनास आले असून काही महिन्यापूर्वी भक्ती मार्गावरील एक दुकानचालक महिलेस पोलीस असल्याची थाप मारून सोन्याची दागिने लंपास करण्यात आली.तर अकलूज बायपास रस्त्यावरून निघालेल्या डोंबे गल्लीतील वृद्ध दाम्पत्यास अडवून पोलीस असल्याची थाप मारून सोन्याची आभूषणे लंपास करण्यात आली होती.या घटनांमुळे पंढरपुरात तोतया पोलीस अधून मधून आपली करामत दाखवीत असतात असेच म्हणावे लागेल.
        १२ सप्टेंबर रोजी भरदुपारी वर्दळीच्या भागात अशीच एक घटना घडली असून पुरंदर जिल्हा पुणे येथील एक महिला शहरातील जुना कराड नाका परिसरात एका कार्यक्रमासाठी पंढरपुरात आली असता पंढरपूर बसस्थानका वरून रिक्षाने दुपारी ३:४० वाजनेचे आसपास जुना कराड नाका येथे रिक्षातून उतरून कार्यक्रम ठिकाणी पायी जात असताना एक अज्ञात इसम समोर आला व पोलीस असल्याचे सांगत तुम्ही गळ्यात सोने का घातले आहे,ते काढा पुडीत ठेवा असे सांगतिले.यावेळी त्याने समोरून येणाऱ्या एका इसमास देखील हेच सांगतिले व सदर महिलेचे मंगळसूत्र व त्या इसमाची चेन  पुडीत बांधली.आणि चालत निघून गेला.सदर तोतया पोलीस असल्याचे सांगणारा इसम  निघून गेल्यानंतर महिलेने कागदाची पुडी उघडून पाहिली असता पावणेचार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास झाल्याचे लक्षात आले.
    या प्रकरणी सदर महिलेकडून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *