ताज्याघडामोडी

सप्टेंबरमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद, पहा संपूर्ण यादी

ऑगस्ट महिना संपत आहे आणि लवकरच सप्टेंबर महिना सुरू होणार आहे. सप्टेंबर महिन्यात १८ दिवस बँक हॉलिडे असणार आहे. या महिन्यात सुट्ट्यांची यादी मोठी आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार रविवारी आणि दुसर्‍या व चौथ्या शनिवारी अशा मिळून सप्टेंबर महिन्यात १३ दिवस बँका बंद असणार आहे.

बँकांतील व्यवहार आणि कामे सर्वांनाच करावी लागतात. त्यामुळे सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. माहिती असल्याने अत्यावश्यक कामे तुम्हाला लवकर पूर्ण करता येतील. बँका बंद राहणार असल्या तरी देशभरात सर्वच ठिकाणी एकाचवेळी बँका बंद राहणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सुट्ट्या प्रादेशिक आहेत. याचा अर्थ काही राज्यांमध्ये काही दिवस फक्त बँका बंद राहतील पण इतर राज्यांमध्ये सर्व बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.

1 सप्टेंबर : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) – पणजीत बँका बंद

4 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

6 सप्टेंबर: कर्मपूजा – रांचीमध्ये बँका बंद

7 सप्टेंबर: पहिला ओणम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

8 सप्टेंबर: थिरुओनम- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद

9 सप्टेंबर: इंद्रजात्रा-गंगटोकमध्ये बँक बंद

10 सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), श्री नरवण गुरु जयंती

11 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

18 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

21 सप्टेंबर: श्री नरवणे गुरु समाधी दिन – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद

24 सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)

25 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)

26 सप्टेंबर: नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही चौरेन हौबा – इम्फाळ आणि जयपूरमध्ये बँका बंद

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *