उमरखेड येथे तान्हा पोळा सण उत्सव असताना त्यादिवशी कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने वार करून पत्नीची हत्या केली. ही घटना 27 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. अश्विनी विशाल पोंगाडे असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
अश्विनी गेल्या चार महिन्यापासून उमरखेड येथील व्यंकटेश नगर येथे आपल्या भावाच्या घरी चार महिन्यापासून राहत होती. 27 ऑगस्ट रोजी तिचा पती विशाल नारायण पोंगाडे वय 40 वर्षे हा उमरखेड येथे आला होता. दरम्यान पती-पत्नीमध्ये वाद झाला वादाचे रूपांतर मारहाणीत होऊन त्याने तिच्यावर शस्त्राने वार करून तिची हत्या केली. दरम्यान याप्रकरणी मृतकचा भाऊ श्याम कदम याने उमरखेड पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली.
त्यावरून उमरखेड पोलिसांनी पती विशाल पोंगाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृतक महिलेला एक मुलगा, दोन मुली असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सतत होणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे जिल्हा पुन्हा हादरला आहे.
![]() |