साखर कारखाना कामगाराच्या पत्नीची आत्महत्या
पती पत्नीचं नातं हे कुठल्याही अपेक्षा विरहित असतं,सुख सुखात संकटात साथ देणार असतं असं मानलं जाते.मात्र वैवाहिक आयुष्यात काही घटना अशा घडतात कि त्यामुळे या पवित्र नात्याची वीण किती कमकुवत होऊ शकते हे पाहवयास मिळते.अशीच एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात घडली आहे. या तालुक्यातील शिरटे येथील साखर कारखाना कामगार व शेतकरी असलेल्या भगवान खोत यांच्या पत्नीने पतीने मोबाईलचे लॉक उघडून दिले नाही त्यामुळे निराश होत घराच्या तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनीषा भगवान खोत असे मृत महिलेचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात शिवाजी निवृती खोत यांनी फिर्याद दिली आहे.
शुक्रवारी सकाळी भगवान यांचा मोबाइल पत्नीने घेतला. त्याचा लॉक काढून द्या असा हट्ट पत्नी भगवान यांच्याकडे करू लागली. परंतु भगवान यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मोबाइल लॉक काढून दिला नाही त्यामुळे पत्नी निराश झाली आणि चहा नाश्ता झाल्यानंतर काही वेळातच बाजूच्या खोलीमध्ये जाऊन पत्नीने साडीच्या साह्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.