कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेमध्ये मंगळवार, दि.१६.०८.२०२२ रोजी श्रध्येय.कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या संकल्पनेतून कर्मयोगी स्मृती महोत्सवाला या वर्षी सुरुवात झाली.
आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत कर्मयोगी हि संस्था नेहमीची आपली वेगळी छाप पंढरी मध्ये टाकताना आढळते.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता कर्मयोगी विद्यानिकेतन हि शाळा एक उत्तम दालनच आहे. श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या विचारामुळेच केवळ विद्यानिकेतन शाळेलाच नाही तर अख्या पंढरपूर मधील शाळेतील विद्यार्थांच्या पंखाना बळ देण्याचा प्रयत्न करत असते. त्या करिताच याही वर्षी विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन दिनांक १६.८.२०२२ ते १८.८.२०२२ रोजी. केले आहे.
कार्यक्रमाची सुरवात श्रध्येय सुधाकरपंत परिचारक यांच्या फोटोला अभिवादन करत , प्रशालेच्या प्राचार्या सौ.प्रियदर्शिनी यांच्या समवेत गणेश वाळके सर तसेच परीक्षक सौ.वैशाली शेंडगे, स्पर्धक पालक ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेची घंटा वाजविण्यात आली.
आंतरशालेय स्पर्धांमध्ये कविता वाचन ,श्लोक पठन, कथाकथन,रांगोळी,चित्रकला,एकपात्री अभिनय,नाटिका,वक्तृत्व,निबंध इत्यादी स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता स्पर्धेकरिता प्रथम गट इ.५वी ते ७वी , दुसरा गट इ. ८ वी ते१० वी असे गट करण्यात आले आहेत.
स्पर्धेमध्ये एकूण १६ शाळांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला आहे . आज झालेल्या वकृत्त्व – डॉ.सौ.मैत्रेयी केसकर आणि सौ.वैशाली शेंडगे/नाटिका – प्रा.डॉ.नागीण सर्वगोड/चित्रकला आणि रांगोळी – अमित वाडेकर व विलास जोशी सर/श्लोक पठन सौ.तारामती खिस्ते/निबंध-सौ.अंजली उत्पात,श्री.श्रीपाद याळगी, श्री प्रसाद खिस्ते,सौ.विजयालक्ष्मी शिवशरण अशा अनुभवी परीक्षकांचे निःपक्षपातीपणे मोलाचे योगदान लाभले.
स्पर्धेतील सर्व गटातून विजेत्या विद्यार्थ्यांची नावे लवकरच कळविण्यात येतील अशी माहिती प्रशालेच्या प्राचार्या सौ.प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी दिली.. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ गुरुवार, दि.१८.०८.२०२२ रोजी मा.सौ.सीमाताई प्रशांतराव परिचारक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,असेही यावेळी प्राचार्या यांनी सांगितले. आजचा स्पर्धक विद्यार्थी हा भविष्यातील उत्तम वक्ता होईल आणि आपल्या संभाषणाच्या जोरावर अख्ख जग जिंकेल असा विश्वास वक्तृत्व स्पर्धेच्या परिक्षका सौ.वैशाली शेंडगे/ डॉ.सौ.मैत्रेयी केसकर यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमा करिता पांडुरंग प्रतिष्ठानचे चिफ ट्रस्टी रोहन परिचारक यांनी स्पर्धकांना सुभेच्छा दिल्या,विद्यार्थ्यांना या वयापासूनच जर विविध कलागुणांना वाव दिला तर नक्कीच भारताची भावी पिढी प्रगल्भ बुद्धीची तयार होईल असे उदबोधन यावेळी त्यांनी केले.या प्रसंगी संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके आणि शिक्षक वृंद उपस्थित होते. सौ प्रियदर्शिनी सरदेसाई यांनी सर्व स्पर्धांच्या ठिकाणी जाऊन परीक्षकांचे स्वागत केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.गिरीश खिस्ते यांनी केले.तर प्रशालेचे शिक्षक समाधान सर यांनी आपल्या कॅमेरातून सर्व स्पर्धांचे चित्रीकरण आणि स्पर्धांचे सुवर्ण क्षण टिपले. संपूर्ण कार्यक्रमाकरिता कर्मयोगी विद्यानिकेतनचे शिक्षकवृंद आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.