ताज्याघडामोडी

म्हैसाळ योजनेत वाढीव लाभक्षेत्रासाठी नवीन आराखडा तयार करा

आ.समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागाची पूर्ण दुष्काळी भाग म्हणून असणारी ओळख पुसणार असून दुष्काळात जन्म घेतलेल्या जनतेला दुष्काळात मरू देणार नाही,म्हैसाळ योजनेत 13 गावांचा समावेश असून यापूर्वी केलेल्या आराखड्यात या योजनेतील पाण्याने या भागातील सर्व शेती लाभक्षेत्राखाली येणार नसून प्रत्येक गावातील सुमारे २० ते ३० टक्केच क्षेत्र ओलिताखाली येणार आहे त्याचबरोबर शिरनांदगी,पडोळकरवाडी तलावातही पुरेसे पाणी सोडण्यात येत नव्हते त्यामुळे एवढी मोठी योजना राबवून गावातील सर्व क्षेत्राला पाणी मिळत नसेल तर उर्वरित क्षेत्रालाही पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करावा लागणार असून त्यासाठी मंत्रिमंडळ स्थापन होताच बैठक लावून नवीन वाढीव आराखडा मंजूर करून घेतो तरी तात्काळ सुधारित प्रस्ताव तयार करून पाठवा अशा सूचना आ समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत ते म्हैसाळ योजनेतील अधिकाऱ्यांची बैठक मंगळवेढा येथे आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी त्यांनी सांगितले की तालुक्यातील 13 गावे या म्हैसाळ योजनेत समाविष्ट आहेत यामध्ये १.२७ टीएमसी पाणी या गावांना मिळणार आहे यामध्ये रेवेवाडी ३६१ हेक्टर,हुन्नूर ६४९,लोणार ४२०,महमदाबाद ६८४, पडळकरवाडी ३७७,शिरनंदगी ४७२,मारोळी ५६३,चिकलगी ६४४ जंगलगी ४२६,सलगर बु ४८७ सलगर खु २३७,बावची ३७३,पौट ३०७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे मात्र हे क्षेत्र अत्यल्प असून गावातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी पाठपुरावा करणार असून शिरनांदगी, मारोळी, पडोळकरवाडी, मानेवाडी,लवंगी,सलगर( खु),शिवनगी येथील तलावात पाणी सोडण्यासाठी नवीन आराखडा करावा लागणार आहे त्याच बरोबर टॅंक फिडिंग करून ज्या ठिकाणी पाणी जात नाही तेथे पाणी नेण्याचे प्रयत्न करावे लावणार असून नवीन मंत्रिमंडळ स्थापन होताच बैठक लावून सर्व क्षेत्राला पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी सांगितले.
यावेळी म्हैसाळ योजनेचे अभियंता पाटील,कर्जाळ कात्राळ चे सरपंच विजय माने,दामाजीचे माजी संचालक सचिन शिवशरण,उपसभापती धनंजय पाटील,भाजपचे संघटक शशिकांत चव्हाण, शिवसेनेचे येताळा भगत,सलगर खु चे सरपंच विठ्ठल सरगर,येळगी चे सरपंच सचिन चव्हाण,भारत निकम,गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील,पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजकुमार पांडव,मेकॅनिक इंजिनियर सुरवसे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *