ताज्याघडामोडी

अखेर ‘त्या’ वादग्रस्त अधिकाऱ्याची बदली

सोलापूर शहर आणि परिसर वगळता सोलापूर जिल्ह्याच्या उर्वरित भागात कृषी आधारित उधोग अथवा साखर कारखानदारी हेच मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे उद्योग म्हणून ओळखले जातात.या व्यतिरिक्त रोजगार देणारे जे काही उधोग आहेत ते एक तर खाजगी आहेत अथवा अल्प मनुष्यबळाची गरज असलेले आहेत त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व तालुका पातळीवर गरीब घरातील मुलगा शिकला आणि त्याची महानगराकडे नोकरीसाठी जाण्याची तयारी नसेल अथवा शैक्षणिक पात्रता नसेल तर त्याला आपल्याच परिसरात छोट्या मोठ्या व्यवसायात अथवा दुकानात काम शोधावे लागते तर जे अर्धशिक्षित अथवा अशिक्षित आहेत असे बहुतांश लोक बांधकाम मजूर म्हणून काम करताना दिसून येतात.

याच बरोबर जिल्ह्यात विविध माध्यमातून रोजगार करून आपल्या कुटूंबासाठी झटणाऱ्या महिला वर्गाची संख्याही मोठी आहे.आणि अशा वर्गासाठी न्यायाचा अथवा शासकीय सावलीत मिळविण्याचे प्रवेशद्वारे म्हणून ओळख आहे ती सोलापुरातील सह.कामगार आयुक्त कार्यालयाची.मात्र या ठिकाणी सह आयुक्त म्हणून स्थानपन्न झालेले यलगुंडे हे सहआयुक्त म्हणजे वादग्रस्त कारकिर्दीचे आणि बेफिकीरीपणाचे एक उदाहरणच म्हणावे लागेल.त्यांनी परवाच गणेश बोड्डू नामक व्यक्ती विरोधात खंडणी मागितल्याची फिर्याद दाखल केली खरी पण सामान्य जनतेमध्ये  सहानुभूती मिळाली ना त्यांच्या बाबत सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

आज अखेर या निलेश यलगूनडेंची बदली झाल्याचे वृत्त माध्यमातून झळकताच विविध कामगार संघटनाचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य अन्याय ग्रस्त कामगार हेही आनंदित झाले असून कोरोनामुळे खाजगी कामगार,बांधकाम कामगार प्रचंड आर्थिक अडचणीत असताना लोकाभिमुख कारभार करून निलेश यलगुंडे हे या गोरगरीब कामगारांसाठी हिरो ठरले असते पण मनमानी,सामान्य जनतेशी उद्धट वर्तन,आलेल्या तक्रारीची दखल घेण्याबाबत बेफिकीरी यामुळे यलगुंडे यांच्या बाबत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत होती.त्यांची अखेर तडकाफडकी बदली झाली असून या ठिकाणी आता पुणे येथे कार्यरत असलेले सह.कामगार आयुक्त विपुल निखिल वाळके यांची नियुक्ती झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *