ताज्याघडामोडी

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर -आ.समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते,ही बाब विचारात घेऊन शासनाची लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे (२५१५) ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी व ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचविण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांतील विकास कामासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी समाधान आवताडे यांनी दिली आहे. 
महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग या विभागाकडे आ. आवताडे यांनी सदर निधीची मागणी केली होती. सन २०२१ – २२ या अर्थिक वर्षातील तरतुदीद्वारे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्याच्या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबुतीकरणासाठी व रस्ते दुरुस्तीकरणाला आवताडे यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे त्या दृष्टीने या शासकीय विभागाकडे मागणी करून सदर भरीव निधी मंजूर केला आहे नुकताच पंढरपूर व मंगळवेढा नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांना ५ कोटी निधी आणला असून दोनच दिवसांमध्ये ग्रामीण भागातील विकास कामांनाही १ कोटींचा निधी उपलब्ध करून आणला असून ही कामे लवकरच सुरू होणार असल्याचे आ समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *