ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड पब्लिक स्कूलचा १० वी व १२ वी सीबीएसई परीक्षेचा १०० टक्के निकाल

पंढरपूर: प्रतिनिधी 

कोर्टी – सोलापूर जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून नेहमी आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख सतत चढता ठेवनारी संस्था म्हणून प्रसिद्ध असलेली कोर्टी येथील सिंहगड पब्लिक स्कूलच्या इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सी.बी.एस.ई द्वारा घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परिक्षेचा १०० टक्के निकाल लागल्याची माहिती शाळेच्या प्राचार्या स्मिता नवले यांनी दिली.

यामध्ये इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक रमा जगदाळे ९८.२ टक्के, द्वितीय क्रमांक सई जगदाळे ९७.२ टक्के, तृतीय क्रमांक नेहा मोरे व शोएब बोहरी ९६ टक्के गुण मिळवून यश मिळवले. तर बारावी मध्ये प्रथम क्रमांक अहद नर्देकर ९४.६ टक्के गुण, द्वितीय क्रमांक सानिया नदाफ ९३.६ टक्के गुण तर तृतीय क्रमांक मोईज उमराणी ९१.८ टक्के गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.

या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रो. एम. एन. नवले, संस्थेच्या शिक्षण विभागाच्या संचालिका डॉ. आशा बोकील, पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटचे कँम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश करांडे, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *