सोलापूर येथे २९/३०/३१ जुलै रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित २५ व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलना निमित्त गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी ज्ञान प्रवरतन उपक्रमाचा प्रारंभ कोल्हापूर येथील जैन मठाच्या सभागृहात अभिनव लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामिजिंच्या पावन सानिध्यात दि.१३/०७ /२०२२ रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दीप प्रज्वलित करून संपन्न झाला.
या प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ रावसाहेब पाटील यांनी तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात जे विविध कार्यक्रम होणार आहेत त्याची माहिती दिली. बहुजन समाजापर्यंत जैन साहित्य पोहोचविण्यासाठी संमेलन हे सशक्त व प्रभावी माध्यम असल्याचे सांगून संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.पूज्य स्वामीजींनी संमेलनास आशीर्वाद प्रदान करून सर्वांच्या कल्याणाची भावना प्रगट केली .
प्रारंभी महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेचे चेअरमन डी ए पाटील यांनी परिषदेच्या वाटचालीचा मागोवा घेतला.स्वामीजींनी या संमेलनाला आशीर्वाद देऊन सर्व पदाधिकाऱ्यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त यथायोग्य सन्मान केला. मठाची प्रदीर्घ काळ सेवा करणारे अजित सांगावे यास स्वामीजींनी पुरस्कार देवून गौरव केला.
या प्रसंगी प्राचार्य श्रीधर हेरवाडे,शिवाजी विद्यापीठाच्या महावीर अध्यासनाचे संचालक प्रा.ककडे,शाहू संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ खणे, द.भा.जैन सभेचे खजिनदार संजय शेटे,जैन बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे,संजय पाटील, बुगटे, प्रशांत पाटील, अभय भिवते,प्रा. संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमापूर्वी जयसिंगपूर येथील कर्मवीर पतसंस्थेच्या सभागृहात डॉ महावीर अक्कोळे, सौ नीलम माणगावे,राजू होसकले,सुरेश रेडेकर, विजय बेलंकी,विजय दादा आवटी,प्रा भगाटे,प्रा. मंडपे आदि साहित्यिकांच्या उपस्थितीत सम्मेलनासंबंधी बैठक झाली.