ताज्याघडामोडी

अभिजित पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

सहकार्याच्या आश्वासना बद्दल मानले आभार 

पंढरपूर तालुक्याच्या अर्थकारणाचा व राजकारणाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच पार पडलेल्या निडवणुकीत अभिजित पाटील यांच्या नेत्तृत्वाखालील पॅनलने विजय संपादन करीत विठ्ठल परिवारातील दोन मात्तबर गटांना पराभूत केले होते.मात्र विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक दूर करण्यासाठी व विठ्ठल कारखान्यास आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी अभिजित पाटील यांनी पदभार हाती घेताच तातडीने पावले उचलण्यास सुरवातही केली असल्याचे दिसून येत आहे.मात्र याच वेळी विजय संपादन केल्यानंतर त्यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेण्यास सुरवात केली असून राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वां शरद पवार यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली होती तर आज अभिजित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून यावेळी आमदार प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित होते.देवेंद्र फडणवीस यांनी अभिजित पाटील यांचे  विजयाबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचाली साठी सहकार्याचे आश्वासन दिल्याबद्दल अभिजित पाटील यांनी आभार मानले.

विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा गेल्या काही वर्षांपासून प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.अशातच राज्य शासनाकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास वेळोवेळी थकहमी देऊन राज्य सहकारी बँकेमार्फत करण्यात आलेला कर्जपुरवठा व हे कर्ज थकल्यामुळे राज्य सहकारी बँकेने या कारखान्या विरोधात उचलेले कायदेशीर कारवाईचे पाऊल याची विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात मोठी चर्चा झाली होती.आरोप प्रत्यारोप झाले होते.मात्र आता निवडणुकीत यश संपादन करून चेअरमन पदाची धुरा हाती घेताच अभिजित पाटील यांनी कारखान्यास आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी योग्य त्या उपाय योजना करत असतानाच राज्यातील जेष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन प्राप्त व्हावे यासाठी गाठीभेटीचे सत्र सुरु केले आहे.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिजीत पाटील यांच्यात नक्की काय चर्चा झाली याचा तपशील मिळू शकला नसला तरी या भेटीवेळी उपस्थित असलेले भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आणि अभिजित पाटील यांच्यातील जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे या भेटीतून नक्कीच विठ्ठल सहकारी साखर कारखाण्याच्या पुढील वाटचालीस राज्य शासन स्तरावर सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *