ताज्याघडामोडी

“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशालेत आषाढी वारीनिमीत्त “पालखी व दिंडी सोहळा” उत्साहात संपन्न

मंगळवार, दि.०५.०७.२०२२ रोजी विठुरायांच्या गजरात तसेच संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाजांच्या नावाचा जयघोष करत, श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित संस्कार जपणारी व मुलांमध्ये संस्कार रुजविणारी तसेच अशी ओळख असणारी एकमेव प्रशाला म्हणजे कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला पंढरपूर येथे आज पालखी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक श्री व सौ काटे आणि श्री व सौ.पाठक, प्राचार्या, सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे व पालखीचे पूजन करुन हरीनामाच्या गजरात दिंडीचे प्रस्थान झाले. 

वांगीकर नगर-स्वामी समर्थ मंदीर परिसर-नागालॅड हॉटेल मार्गे दिंडी विद्यानिकेतन येथे पोहोचली. यावेळी परिसरातील सर्व नागरिकांनी दिंडीचे स्वागत करून दर्शन घेतले तसेच विद्यानिकेतनच्या मैदानावर गोल रिंगण सोहळा पार पडला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून पालखी सोहळ्याचा आनंद घेतला तसेच विद्यानिकेतन मधील विद्यार्थी व शिक्षकांनी काटवटखाना, फुगडी, भूईचकरे इ.खेळांचा आनंद घेतला. यावेळी संस्थेचे चिफ ट्रस्टी श्री रोहनजी परिचारक, संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, प्राचार्या, सौ. प्रियदर्शिनी सरदेसाई, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *