ताज्याघडामोडी

फॅबटेक पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरु

फॅबटेक पॉलिटेक्निकमध्ये थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया सुरु
सांगोला : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग  प्रवेशासाठी  फॅबटेक  पॉलीटेक्नीक सांगोला या महाविद्यालयात शासनमान्य सुविधाकेंद्र सुरु करण्यात आले आहे.

या सुविधा केंद्रा मार्फत  डिप्लोमा थेट द्वितीय वर्ष  प्रवेशासाठी नोंदणी करण्याची प्रक्रिया १० जून पासून सुरु झाली असल्याची माहिती पॉलीटेक्नीकचे प्राचार्य प्रा.शरद पवार यांनी दिली. इच्छुक विद्यार्थी  ऑनलाईन  ऍडमिशन  फॉर्म भरणे, फॉर्मची पडताळणी करणे  आणि फॉर्म कनफर्म करणे हि प्रक्रिया ८ जुलै पर्यंत करू शकत असून त्यासाठी  उत्तम गतीचे १०० एमबीपीएस क्षमता असलेल्या इंटरनेट सुविधेसह सर्व बाबी सज्य आहेत. तसेच महाविद्यालयाची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती पाहून तंत्रशिक्षण संचालकांनी फॅबटेक पॉलीटेक्नीकला  फॅसिलिटी सेंटर क्र.६७५६ केंद्र म्हणून गेल्या नऊ  वर्षांपासून सतत मान्यता दिलेली आहे.

थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग प्रवेशासाठी १२ वि सायन्स  ( ग्रुप ए , ग्रुप  बी   किंवा  ए  आणि बी ), आयटीआय  आणि एमसीवीसी (प्लस २) हे विद्यार्थी पात्र असून ग्रुपची कोणतीही अट  नाही  तसेच १२ वि मध्ये गणित विषय असणे देखील बंधनकारक नाही. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास भेट देऊन प्रवेशासाठी नाव नोंदणी करण्याचे व अधिक माहितीसाठी प्रा मोहन लिगाडे (९४०४६७०३९८) व प्रा तन्मय ठोंबरे (८४०८८८८६३३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *