गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कर्ज न फेडल्याने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

औरंगाबादमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे.कर्ज न फेडल्याने महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत 39 वर्षीय तक्रारदार महिलेकडून 18 हजार 184 रूपये गायब केले आहे. पैसे उकळल्यानंतर देखील आरोपींनी महिलेच्या आधारकार्ड, पॅन कार्ड व इतर कागदपत्रावरील फोटोंचा वापर करून ते अश्लील मजकुरासह सोशल मीडियावर शेअर केली आहे.

तक्रारदार महिला मूळची पुणे येथील खडकी परिसरातील असून ती सध्या औरंगाबादमध्ये राहत आहे. दरम्यान, भामट्यांनी 20 एप्रिल ते 30 मे 2022 दरम्यान तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर वेगवेगळ्या सोळा क्रमांकावरून फोन करून तुम्ही संस्थेकडून घेतलेले कर्ज बाकी असून त्याची परतफेड करा, नाही तर आम्ही सोशल मीडियावर तुमची बदनामी करू, अशी धमकी दिली होती. त्यामुळे तक्रारदार महिलेने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर 18 हजार 184 रुपये पाठवले होते.

त्यानंतर तक्रारदार महिलेकडून पैसे घेतल्यानंतर देखील भामट्यांनी तिचे आधार कार्ड, पॅनकार्ड व इतर कागदपत्रावरील फोटोंचा वापर करून सोशल मीडियावर तक्रारदार महिलेविषयी अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर शेअर करून तिची बदनामी केली आहे. यानंतर महिलेनं आरोपीविरुद्ध उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *