ताज्याघडामोडी

मी वादग्रस्त विधान केलेलं नाही! राज्यपाल, मंत्री आणि भाजप प्रवक्त्यांनी केलं; अजित पवारांनी ठणकावलं

छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात राज्याचे विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर भाजपने राज्यभर मोर्चे काढले आणि त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.

यासंदर्भात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली. त्यांच्या विधानाला वादग्रस्त विधान असं पत्रकारानं संबोधतात अजित पवारांनी आपल्या स्टाइलमध्ये उत्तर दिलं. तसेच सूडबुद्धीने हे सारं केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

 

राज्यात वीज कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत असे असताना वादग्रस्त विधानं होत आहेत, असं एका महिला पत्रकारानं म्हणतातच अजित पवार यांनी त्यांना मध्येच रोखलं. एक मिनिट मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. वादग्रस्त विधान हे राज्यापालांनी केलं, मंत्र्यांनी केलं, त्यांच्या आमदार आणि प्रवक्त्यांनी केलं आहे. मी वादग्रस्त विधान केलेलं नाही. मी आजही माझ्या विधानाशीच ठाम आहे, असं अशा शब्दात त्यांनी ठणकावलं. असं असलं तरी आदरणीय शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं आहे त्या मताशी मी सहमत आहे’, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा भाषणाच्या वेळी मी केलेल्या भाषणातील काही मुद्द्यांवर दोन-तीन दिवसांनंतर काही तरी पसरवून महाराष्ट्रभर काही घटना घडताहेत असं म्हणत अजित पवार यांनी पार्श्वभूमी समाजावण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात 11 मार्च 2022 च्या अर्थसंकल्पावेळी वढूबुद्रूक व मौजे तुळापूर तालुका शिरूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीला साजेसे स्मारक उभारण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाची आठवण करून दिली. स्मारकाच्या कामासाठी घेतलेला पुढाकार त्यांनी लक्षात आणून दिला. बाल शौर्य दिनाचा उल्लेख झाला त्यानंतर मी हा मुद्दा देखील लक्षात आणून दिला. कदाचित स्मारकाचा मुद्द्याला मी हात घातला त्यामूळे हे सूडबुद्धीने सुरू असल्याचं अजित पवार म्हणाले.

मी महापुरुष, स्त्रीया यांच्यासंदर्भात कधीही चूकीचं वक्तव्य केलेलं नाही. भाजपच्या मंत्र्यांनी उलट चुकीची विधान केली. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी अजित पवार यांच्याविरोधात भाजपने त्यांच्या स्थानिक नेते कार्यकर्ते यांना आंदोलन करण्यासाठी सांगितले. काही मंत्री, आमदार, खासदारांनी फोन करून मला सांगितलं की आम्हाला सांगण्यात आलं आहे की अजित पवारांविरोधात आंदोलन करा, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करा, कोणते पोस्टर कसे असावेत, अजित पवारांच्या फोटोंवर फुली असावी, मायना काय असावा सारं पाठवण्यात आलं आहे. आम्हाला तुमचं विधान चुकीचं वाटत नाही पण पक्षाने सांगितलं आहे, आंदोलन करा आणि फोटो काढून पक्षाला पाठवा, या पद्धतीनं हे आंदोलन झालं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *