ताज्याघडामोडी

कर्तुत्वान नागरिक घडविण्याचे काम सिंहगड करत आहे

पंढरपूर सिंहगड मधील माजी विद्यार्थ्यांचे मत

पंढरपूर: प्रतिनिधी 

महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर दिवस असतात. शिक्षण पुर्ण झाले तरी महाविद्यालयातील आणि सोबत्यांच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात कायम लक्षात असतात. सिंहगड कॉलेज मधील २०१८-२०२१ च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.

  या मेळाव्यानिमित्त अनेक नवर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्र आले आणि महाविद्यालयातील आठवणींमध्ये रमून गेले. यादरम्यान मनोगत व्यक्त करताना सिंहगड कॉलेज च्या शिक्षणाबद्दल व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत कर्तुत्वान नागरिक घडविण्याचे काम सिंहगड काॅलेज करत असल्याची भावना यादरम्यान माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना केली.

    एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मधील मेळाव्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डीन डाॅ. बी. बी. गोडबोले, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्याम कुलकर्णी, डाॅ. श्रीगणेश कदम, प्रा. नामदेव सावंत, विद्यार्थी प्रतिनिधी वैभव कोळवले व पुजा होळकर आदीच्या हस्ते सरस्वती पूजन करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

    या मेळाव्याचे प्रास्ताविक करताना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर म्हणाले, महाविद्यालयातील प्लेसमेंटची टक्केवारी प्रत्येक वर्षी वाढत असुन अनेक नामांकित कंपन्या कडून पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मागणी होत आहे. या अनुशंगाने महाविद्यालयाची वाटचाल चालू असुन विद्यार्थ्यांना जास्तीत-जास्त पॅकेजची नोकरी देण्यासाठी सिंहगड महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे मत डाॅ. समीर कटेकर यांनी व्यक्त केले.

    माजी विद्यार्थी पुजा होळकर, वैभव कोळवले आदीसह अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली. यादरम्यान माजी विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे सुञसंचलन विद्यार्थी चंद्रिका ढाळे व संदीप क्षिरसागर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. समीर कटेकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्रा. अभिजित सवासे, अमोल नवले सह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *