ताज्याघडामोडी

देगलूर -बिलोली मतदार संघात पंढरपूर ची पुनरावृत्ती होईल

विधानसभा  निवडणुकीत युती केली नसती तर भाजपचे १४४ आमदार निवडून आले असते युतीत तुम्ही आम्हाला धोका दिला म्हणून आमचे २० आमदार पडले आम्ही धोका दिला असता तर तुमच्या केवळ ५ जागा आल्या असत्या असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. 

देगलूर -बिलोली मतदार संघात पंढरपूर ची पुनरावृत्ती होईल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला . देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवणुकी संदर्भात देगलूर येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांचा मेळाव्यात ते बोलता होते या कार्यक्रमात शिवशेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला त्यांची उमेदवारी भाजपने जाहीर केली.

मेळाव्याला खासदार प्रतापराव चिखलीकर , आमदार डॉ तुषार राठोड आ.  राजेश पवार आमदार राम रातोळीकर आदी उपस्थित होते भाजपने मागील निवडणुकीत सर्वात जास्त मते घेतली होती १२४ जागा लढून आमचे १०५ आमदार आले अपक्ष आमदार हि आमच्याच संपर्कात होते मात्र उद्धव ठाकरेंचे सरकार येणार असल्याचे समजल्याने ते आमदार महाविकास आघाडीकडे गेले असेही पाटील यावेळी म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *