ताज्याघडामोडी

बंडातात्या कराडकर यांची पोलीस स्थानकातून सुटका

बंडातात्या कराडकर यांची पोलीस स्थानकातून सुटका करण्यात आली आहे. बंडतात्या यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. दरम्यान, त्यांची जामिनावर सुटका झाली असल्याची माहिती त्यांचे वकील संग्राम मुंढेकर यांनी दिली आहे.

महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सातारा शहर पोलिसांनी बंडातात्या यांच्यावर कलम १८८, २६९, ५०० आणि ५०९नुसार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी चौकशीसाठी बोलवले होते. यादरम्यान, त्यांची अडीच तास चौकशी झाल्यानंतर तात्पुरता त्यांची जामिनावर सुटका केली असल्याची माहिती वकील संग्राम मुंढेकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *