ताज्याघडामोडी

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाळू माफियांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळू माफिया तसेच वाळू माफियांशी साटेलोटे करू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाचं दम दिला आहे. वाळू (रेती) उत्खनन करून पर्यावरण धोक्यात आणणारे राज्य सरकारचा महसूल बुडावणाऱ्या विरुद्ध राज्य सरकारकडून कडक कारवाई केली जाईल, असा थेट इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज तीन दिवसीय ‘मिनकॉन’ परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते.

राज्यात आलेले नवीन सरकार हे पैसे खाणारे आणि धंदा करणारे नाही लक्षात ठेवा. रेतीचा व्यवहार मंत्री आणि जनप्रतिनिधी काळाबाजार करत होते ते आता चालणार नाही. एकही पैसा आम्हाला नको. मात्र एक एक पैसा हा जनतेचा तो सरकारी तिजोरीत जाईल असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे. जे काळाबाजारी आणि भ्रष्ट्राचार करतील त्यांना मी जेलमध्ये टाकील. आमच्या पर्यावरणाला धोक्यात आणून केलेले व्यवहार कदापि खपवून घेतले जाणार नाहीत. आधी काय केलं हे मला माहीत नाही; पण पुढे हे मी सहन करणार नाही, अशा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकारी आणि वाळू माफी यांची कानउघाडणी केली आहे.

सरकारच्या उपक्रमाचे पालन होत नसेल तर अधिकाऱ्यांना घरी बसवायला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकार बदलले हे लक्षात आले पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *