ताज्याघडामोडी

करूणा शर्मा यांच्या गाडीत पोलिसांना आढळले पिस्तुल, चौकशी सुरु

आज बीड जिल्ह्यातील परळीत दिवसभर चांगलच तणावाचे वातावरण होते. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या करुणा शर्मा या आज बीड मध्ये दाखल झाल्या होत्या.

करुणा शर्मा या येणार असल्याने वैद्यनाथ परिसरात स्थानिक प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जागोजागी बॅरिकेट्सदेखील लावण्यात आले होते. करुणा शर्मा ह्या वैधनाथाचे दर्शन घेण्यास गाडीतून उतरल्या असताना काही महिलांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला तर काही महिलांनी त्यांना धक्का बुक्की देखील केली असल्याचं पहायला मिळालं. दरम्यान, पोलिसांनी करुणा शर्मा यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यांना गाडीत पिस्तूल आढळून आली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या करुणा शर्मा यांना परळी शहर पोलिसांनी पोलीस स्टेशन येथे आणले असून त्याच्या सोबत त्यांचा मुलगा आहे. हे पिस्तूल त्यांचेच आहे का तसेच याचं त्यांच्याकडे लायसन्स आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? स्थानिक कार्यकर्ते

वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या मात्र या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, परळी मध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं. तसेच घेराव देखील घालण्याचा प्रयत्न केला.

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले

करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल आढळून आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थही जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं पहायला मिळत आहे. या प्रकरणात आता चौकशी नंतर पोलीस काय भूमिका घेतात हे पहावं लागेल.

पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले आहे

परळीच्या महिलांसह अनेक नागरिक आक्रमक झाल्यामुळे रस्त्याने परत जात असताना गाडी अडवली. यामुळे पोलिसांनी त्यांना परळी पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले आहे. मात्र परळी मध्ये तणावपूर्ण वातावरण असून पोलीस वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *